आझादी का अमृत महोत्सव १५ ऑगस्ट २०२३ चिखली मध्ये संपन्न
शिराळा प्रतिनिधी : दि.१५ ऑगस्ट २०२३ रोजी शिराळा तालुक्यातील चिखली इथं लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर, व विश्वास विद्यानिकेतन चिखली यांचा संयुक्त ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. शिराळा तालुक्याचे युवा नेते भूषण नाईक आण्णा यांच्याहस्ते हा सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यात विद्यानिकेतन च्या मैदानावर राष्ट्रगीत, झंडागीत, महाराष्ट्रगीत व विद्यार्थी परेड घेण्यात आली.
यावेळी सन २०२३ मध्ये समृद्धी प्रज्ञा शोध ( S.T.S.) परीक्षेत कु. ज्ञानदा तळेकर ( १ ली ), शुभम पाटील, योगीराज भाकरे ( २ री ), शिवतेज यादव ( ३ री ), अथर्व कांबळे ( ४ थी ) यांना आण्णांच्या हस्ते ट्रॉफी, सर्टिफिकेट देण्यात आले. हे सर्व विद्यार्थी केंद्रात निवड झालेले आहेत.
यानंतर प्राथमिक विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांची भाषणे संपन्न झाली. त्यानंतर रांगोळी स्पर्धा, व मातकाम चित्रकला, कला दालनाचे उद्घाटन घेण्यात आले. उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. एस.आर. पाटील सर, देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालय व विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष पांडुरंग चौगुले, तसेच पालक प्रतिनिधी मोहन यादव, व प्रमोद कांबळे हे देखील उपस्थित होते.
प्राथमिक शाळेतील १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ मातकाम, तसेच हर घर तिरंगा, स्वच्छ भारत – सुंदर भारत , झाडे लावा- झाडे वाढवा, बेटी बचाव -बेटी पढावो आदी घोषणा देण्यात आल्या.