ऐतिहासिक किल्ले विशाळगड इथं पशु-पक्षी हत्त्या करणेस बंदी
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले विशाळगड इथं पशु-पक्षी हत्त्या करण्यास बंदी करण्यात आली आहे. अशी माहिती ग्रुप ग्रामपंचायत गजापूर-विशाळगड यांनी दिली आहे.

विशाळगड किल्ला या संरक्षित ऐतिहासिक स्मारकाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कोल्हापूर व संचालक पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संदर्भीय आदेशानुसार बेकायदेशीर पशु-पक्षी हत्त्या करण्यास मनाई करण्यात आली आहे.

यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे रोगराई पसरून सामाजिक आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे येणाऱ्या भाविकांनी बेकायदेशीर पशु-पक्षी हत्त्या करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.