कापशी इथं श्री ट्रॅव्हल्स बस व दुचाकी च्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
बांबवडे : कापशी तालुका शाहुवाडी इथं मुंबईला जाणारी श्री ट्रॅव्हल्स च्या चाकात दुचाकीस्वार आल्याने, त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार श्री ट्रॅव्हल्स क्र.( MH 09AZ-8121) कोकरूड दिशेला निघाली असताना, सरूड दिशेकडे येणारे विजय तुकाराम फडतारे वय ५७ वर्षे रहाणार सुपात्रे तालुका शाहुवाडी स्प्लेंडर क्र. MH09- EZ-0563 वरून बांबवडे दिशेला येत असताना कापशी इथं श्री ट्रॅव्हल्स च्या बस ला धडक बसली. यामुळे ते गाडीच्या चाकात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची शाहुवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, फडतारे यांचे शव ग्रामीण रुग्णालय मलकापूर इथं शव विच्छेदनसाठी पाठविण्यात आले आहे.