कोल्हापूर टंकलेखन संघटनेच्या प्रतिनिधी पदी श्री सागर घाटगे यांची बिनविरोध निवड
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद च्या शासनमान्य टंकलेखन संघटनेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोल्हापूर चे जिल्हा प्रतिनिधी म्हणून फ्रेन्डशिप कॉम्पुटर चे संस्थापक श्री सागर घाटगे सर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे कोल्हपुर जिल्हा टंकलेखन संघटनेच्या वतीने अभिनंदन.
या निवडणुकीसाठी आनंद कॉम्प्यूटर टायपिंग सेंटर, तसेच शिवानी कॉम्प्यूटर सेंटर च्या संचालिका सौ अभिलाषा नाईक मॅडम यांनी देखील या निवडणुकीत अर्ज दाखल केला होता. परंतु आपल्या कोल्हापुरात एकसंघता राहावी, आपली एकजूट टिकून राहावी, यासाठी सौ नाईक मॅडम यांनी आपला अर्ज माघार घेवून कोल्हापूरची दानशूरता दाखवून दिली. याबद्दल श्री घाटगे सर यांच्यासहित जिल्ह्यातील सर्व कॉम्प्यूटर टायपिंग सेंटर च्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.
श्री घाटगे सर हे नेहमीच कोणत्याही सेंटर च्या कामासाठी नेहमी तत्पर असतात. सर्व सेंटर च्या कामातील अडचणी सोडवतात. यासाठी त्यांचे नेहमीच सर्व संस्था चालकांना सहकार्य असते. अशी सर्वांशी जुळवून घेवून काम करणारी व्यक्ती जर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्यस्तरावर जाणार असेल, तर अशा व्यक्तीच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे, याच शुद्ध हेतूने नाईक मॅडम यांनी माघार घेतली, आणि घाटगे सरांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. श्री सागर घाटगे सरांचे ग्लोबल कॉम्प्यूटर टायपिंग सेंटर च्या मंजिरी पवार यांच्या सहित महालक्ष्मी कॉम्प्यूटर टायपिंग सेंटर च्या सौ रंजना पवार व सर्व संस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन.