डॉ. नाझनीन तांबोळी MBBS च्या अंतिम वर्षात प्रथम : पंचक्रोशीच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील नाझनीन वहिदा दिलखुष तांबोळी या विद्यार्थिनीने MBBS च्या अंतिम वर्षात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. नाझनीन हि बांबवडे येथील स्व.एम.ए. तांबोळी सरांची नात आहे. तर आयुर्वेदातील तज्ञ वैद्य डॉ. दिलखुष मकबूल तांबोळी यांची कन्या आहे. ती गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया (नागपूर ) या महाविद्यालयात शिकत होती.

डॉ. नाझनीन दिलखुष तांबोळी यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन. याचबरोबर बांबवडे पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बांबवडे तालुका शाहुवाडी येथील तांबोळी कुटुंब हे सुशिक्षित कुटुंब आहे. स्व. तांबोळी सर यांनी आपल्या कुटुंबाला शिक्षणाचे बाळकडू पाजले. त्यामुळे हे कुटुंब शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध आहे. दिलावर फोटो स्टुडीओ चे दिलदार तांबोळी यांची ती पुतणी आहे.

शाहुवाडी तालुका हि नररत्नांची खाण आहे. हे जरी खरं असलं, तरी छत्रपती ताराराणी यांची पुण्याई सुद्धा इथं तेवढीच मोठी आहे. इथली तरुणी सुद्धा कर्तृत्वामध्ये कमी नाही. इथल्या मातीने केवळ तरुणंच नाही, तर तरुणींना सुद्धा मुक्त हस्ताने यशाचे वरदान दिले आहे. त्यामुळे इथला महिला वर्ग सुद्धा पुरुष वर्गाच्या सोबतीने कर्तुत्व गाजवीत आहे.

त्यामुळे भविष्यात तरुण वर्गाने जर मनात आणले, तर कोणतीही, आणि कितीही कठीण कामगिरी, हि मंडळीसहज पार पाडू शकतात. कारण या मंडळींना इतिहास आहे सह्याद्रीचा. इतिहास आहे ” हिरकणी ” चा, आणि आशीर्वाद आहे इथल्या निसर्गसंपन्न मातीचा.
पुनश्च डॉ. नाझनीन तांबोळी यांचे हार्दिक अभिनंदन.