पत्रकारांनी बातमी ची शहानिशा करून लेखन करावे – श्री विजयसिंह देसाई सरकार
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील सर्वच पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पत्रकारांनी आम्हाला चांगले सहकार्य केले आहे. परंतु काही वेळा अनवधनाने गैरसमज होतात. पत्रकारांनी दोन्ही बाजूंची शहानिशा करून बातम्या प्रसिद्ध कराव्यात. असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख श्री विजयसिंह देसाई सरकार यांनी केले.
शाहुवाडी तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकार दिनाचे औचित्य साधून त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी पत्रकारांनी देखील मनोगते व्यक्त केलीत. यावेळी डॉ. डी.आर. पाटील यांनी विजयसिंह देसाई सरकार यांचे समाजकारण थोडक्यात सांगितले. शाहुवाडी तालुक्यातील कोणीही नागरिक कोल्हापूरला दवाखान्यात दाखल असल्यास त्यांना नष्ट तसेच जेवण यांची सोय विजयसिंह सरकार स्वत: करतात. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. अरुण गिरी सर उपस्थित होते.
या कार्यक्रमास शाहुवाडी तालुका पत्रकार संघ,शाहुवाडी प्रेस क्लब चे पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अॅड. करण देसाई सरकार यांनी केले होते.