बांबवडेचे बोरगे गुरुजी वाचनालय स्पर्धा परिक्षेतील युवकांना आधार- कृषी मंडल अधिकारी प्रकाश पाटील
बांबवडे ( प्रतिनिधी ) येथील बांबवडेचे पैलवान बोरगे (गुरुजी ) वाचनालय व अभ्यासिका एक इानाचे भांडार असून स्पर्धा परिक्षेतील युवकांना एक प्रकारचा आधारच आहे त्यांचा युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी मंडल अधिकारीपदी निवड झालेल्या प्रकाश पाटील ( बांबवडेकर ) यांनी केले.

ते बांबवडे ( ता. शाहुवाडी ) येथील पैलवानबोरगे (गुरूजी ) वाचनालय व स्व.बोरगे ( गुरूजी ) अभ्यासिका यांच्या संयुक्तरित्या आयोजीत प्रकाश मधुकर पाटील या युवकांची कृषी मंडल अधिकारीपदी निवड झालेबद्दल आयोजीत सत्कार समारंभप्रसंगी बोलत होते.

प्रारंभी प्रकाश पाटील यांचा सत्कार अभ्यासिकांच्या संचालिका सौ. वैशाली बोरगे व वाचनाल्यांचे संस्थापक सुभाष बोरगे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना प्रकाश पाटील म्हणाले कोणत्याही प्रकारचा स्पर्धा परिक्षेचा क्लास न लावता हे मी पहिल्यांच प्रयत्नात हे यश मिळावले.वडिलांचे क्षेत्र हरपले पण त्यांची एकच इच्छा होती की तुम्ही अधिकारी झाला पाहीजे. ही मनाशी बांधलेली गाठ कुठेही ढळून न देता केलेल्या प्रयत्नाला यश आले. माझ्या यशात बोरगे ( गुरुजी ) वाचनालयांची किणार आहे. त्यामुळे त्यांनी केलेला हा सत्कार नेहमीचे प्रेरणा देईल. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करताना युवकांनी चर्चात्मक करावा.

या वेळी नेहा मगदूम, कोमल लव्हटे, सागर पाटील, सचिन बंडगर, प्रतिक्षा पाटील, मानसिग लव्हटे, सतिश चिले, आश्विनी पाटील, प्रतिक्षा पाटील, अविनाश पोवार, श्रीधर चिले, मयूर पाटील, दादासो वग्रे, मनोज घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.