ब्रम्हाकुमारीज बांबवडे यांच्यावतीने रविवार दि.२१ मे रोजी मोफत रोग निदान शिबीर
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं ब्रम्हाकुमारीज बांबवडे यांच्यावतीने रविवार दि.२१ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोफत रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ब्राम्हाकुमारीज बांबवडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

बांबवडे येथील ब्रम्हाकुमारीज बांबवडे येथील शिवसागर बिल्डींग मध्ये हे शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधे, कंबर, मान, पाठ,गुडघे दुखी आदी आजारांवर निदान आणि उपचार करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या २६ वर्षांपासून ६ लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी उपचार डॉ. राजू व डॉ. शाम (बडोदा – गुजरात ) यांनी केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरात निदान व उपचार करण्यात येणार आहेत. असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी ९०४९५०८४५३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आयोजकांच्या वतीने सांगण्यात येत आहे.