मलकापूर येथील स्टेट बँकेत नागरिकाची चोरी होताना पकडले
बांबवडे : मलकापूर तालुका शाहुवाडी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये दोन महिलांना पैसे चोरण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आले आहे. सदर घटनेची फिर्याद घोळसवडे तालुका शाहुवाडी येथील यासीन उस्मान परांडे, वय ४८ वर्षे यांनी शाहुवाडी पोलिसात दिली असून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर भा.द.वि.स. कलम ३७९, ३११,३४ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली हकीकत अशी कि,दि. ३१ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान यासीन परांडे हे एक लाख तीस हजार रुपये बँकेत भरण्यासाठी गेले होते. पैसे भरण्याच्या रांगेत ते उभे होते. त्यांचे पैसे प्लास्टिक च्या पिशवीत होते. दरम्यान आरोपी सफिका जुवालासिंग सिसोदिया वय २५ वर्षे, काडी ओमप्रकाश सिसोदिया वय ४० वर्षे दोघीही रहाणार काडीया तहसील पचोर जिल्हा राजगड,राज्य मध्यप्रदेश या महिलांनी फिर्यादी ची पिशवी उभी कशाने तरी कापून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या फिर्यादीवरून शाहुवाडी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक यादव करीत आहेत. सदर महिलांवर या अगोदर देखील सिटी पोलीस स्टेशन खामगाव इथं गुन्हा नोंद असल्याचे समजते.