महाशिवरात्री निमित्त बांबवडे इथं १२ ज्योतिर्लिंग देखावा संपन्न
बांबवडे :महाशिवरात्री निमित्त बांबवडे तालुका शाहूवाडी येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालय शाखेच्या वतीने १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन, सोबत पाण्याचा धबधबा असा नयनरम्य देखावा निर्माण केला आहे. हा देखावा पहाण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली होती. तसेच आध्यात्माविषयी माहिती देखील येणाऱ्या भाविकांना देण्यात येत होती.
याठिकाणी धबधबा प्रवाहित करण्यात आला होता. तसेच शिवशंकराच्या मूर्ती च्या जटेतून गंगा अवतरलेली दाखवण्यात आली. या ठिकाणी १२ ज्योतिर्लिंग १०० फुटी गुंफेत बसवलेले पाहायला मिळाले.
एकंदरीत या देखाव्याच्या माध्यमातून येथील वातावरण भक्तीमय झाले होते. संगीता बहेनजी यांनी येणाऱ्या भाविकांचे स्वागत केले. त्यांच्यासह त्यांच्या अनुयायांनी हा देखावा करण्यासाठी खूप परिश्रम घेतल्याचे दिसून आले.