यशराज ऑप्टीकल्स चा १५ व वर्धापन दिन संपन्न
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील यशराज ऑप्टीकल्स चा १५ व वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. तरुणाई जेंव्हा कष्टाने उद्योगात उतरते, तेंव्हा प्रगती चा आलेख नेहमी चढता राहतो, त्यांचे यश हे त्यांचे प्रगतीपुस्तक आहे. अशा तरुण उद्योजाकांना त्यांच्या उद्योगाच्या वर्धापन दिनाबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा.
यशराज ऑप्टीकल्स हे कमी कालावधीत नावारूपाला आलेले चष्म्याचे दुकान हे एसटी स्टँड समोर आहे. ओंकार व मयूर कदमबांडे या बंधूंचे दुकान आहे. इथं जापनीस टेक्नॉलॉजी चे यंत्र वापरून डोळ्यांची तपासणी केली जाते. केवळ चष्मेच नव्हे तर तरुणाई ला भुरळ पडेल, असे ब्रँडेड गॉगल मिळण्याचे हे एकमेव ठिकाण असू शकेल. कष्ट,जिद्द, आणि चिकाटी या त्रिवेणी संगमाने या बंधूंनी आपल्या उद्योगाला एका उंचीवर घेवून गेले आहेत. बाहेरून येवून केवळ १५ वर्षात मिळवलेले यश वाखाणण्या सारखे आहे.तसेच नोकरीच्या मागे लागणाऱ्या तरुणांसाठी हे मोठे उदाहरण आहे. असो.
पुनश्च कदमबांडे बंधूंना त्यांच्या यशराज ऑप्टीकल्स च्या १५ व्या वर्धापन दिनाबद्दल त्यांचे अभिनंदन ,तसेच भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा.