राज्याभिषेका नंतर निघालेली छत्रपतींची हुबेहूब मिरवणूक आणि विलोभनीय इतिहास : विक्रमसिंह पाटील
बांबवडे : महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातील पूजनीय स्थान आहे. अनेकांच्या घरातील त्यांची तसबीर आपले त्यांच्याविषयी असलेले प्रेम आणि कर्तव्य दर्शविते. अशीच एक तसबीर बांबवडे तील विक्रमसिंह पाटील यांच्या घरातील शोभा वाढविताना आपल्याला पहायला मिळते. हि केवळ शोभेची तसबीर नसून महाराजांविषयी असलेली त्यांची नितांत भक्ती याचे दर्शन घडविते.
अनेकांकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तसबीर आपल्याला पहायला मिळते. परंतु राज्याभिषेकानंतर महाराजांची निघालेली हत्तीवरून मिरवणूक हि आपल्याला शक्यतो पहायला मिळत नाही. ती तसबीर आपल्याला विक्रमसिंह पाटील ( आंबर्डेकर ) यांच्या घरी पहायला मिळते. हि तसबीर, इतिहासाचा गाढ अभ्यासक असलेले व राज्याभिषेक सोहळा समिती चे सदस्य श्री अमितजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध झालेली आहे. ती श्री पाटील यांनी एम्बॉस करून घेतलेली आहे.
या तसबिरीचे उद्घाटन माजी महिला व बालकल्याण सभापती सौ शैलजादेवी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या तसबिरीची अनेक वैशिठ्ये आपल्याला पहायला मिळतील. बुरुजावरून भगवा फडकताना दिसेल. हत्ती, अंबारी आणि त्यांच्यासोबत असलेला लवाजमा पुन्हा एकदा आपल्याला इतिहासात नेल्याशिवाय रहात नाही. अशी इतिहास वेडी माणसेच आपला इतिहास जिवंत ठेवतात, हेच यावरून आपल्याला अनुभवयास येते.