लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये महाराष्ट्र दिन संपन्न
शिराळा प्रतिनिधी : चिखली तालुका शिराळा येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन संपन्न झाला.
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्याध्यापक धनराज गवळी सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्याध्यापक धनराज गवळी सर यांनी आपल्या मनोगतातून महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे महत्व उपस्थितांना समजावून सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन टी.एस. पाटील सर यांनी केले. तसेच चिखली विद्यानिकेतन व लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर चे शिक्षक वृंद व विद्यार्थी गण यावेळी उपस्थित होते.