लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये दहीहंडी संपन्न
शिराळा प्रतिनिधी : लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर चिखली तालुका शिराळा इथं गोपाळकाला मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम गोपालकृष्णाच्या मूर्तीची यथावत पूजा मुख्याध्यापक गवळी सर, शिक्षकवृंद, कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी राधा कृष्णाच्या वेशभूषेत अनेक विद्यार्थी शाळेत दाखल झाले होते. दहीहंडी च्या पूजनानंतर दहीहंडी बांधलेल्या दोराची उंची वाढवण्यात आली.
यावेळी ” गोविंदा आला रे ” च्या जयघोषात, भक्तिमय संगीताच्या तालावर थर लावण्यात आले. पाण्याचा शॉवर लावण्यात आला होता,. तीन प्रयत्न केल्यानंतर चौथ्या प्रयत्नाने मुलींची दहीहंडी इ.४ थी ची विद्यार्थिनी कु.सिद्धी सोरटे हिने फोडली.
यावेळी मुलांची देखील दहीहंडी लावण्यात आली होती. तिथेदेखील तीन ते चार थर लावण्यात आले होते. शेवटी चौथ्या प्रयत्नात कु. श्रेयस चिखलकर याने दहीहंडी फोडण्याचा मन मिळवला.
शेवटी विद्यार्थ्यांनी आणलेल्या लाह्या, फुटाणे, चिरमुरे, तसेच फरसाण एकत्र करून, त्याचा प्रसाद म्हणून विद्यार्थ्यांना वाटण्यात आला. यानंतर दहीहंडी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.