वारूळ इथ गॅस टँकर च्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी : चालक आगीमुळे ४०% भाजल्याने रुग्णालयात
बांबवडे : वारूळ तालुका शाहुवाडी इथ गॅस टँकर सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान झाडाला आदळून झालेल्या अपघातात गॅस टँकर ने पेट घेतला. त्यामुळे मलकापूर- रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, गॅस टँकर जयगडहून कोल्हापूर दिशेला निघाला होता. दरम्यान वारूळ इथं चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्यालगत असलेल्या झाडावर जावून आदळला. यामुळे ड्रायव्हर च्या केबिन ने पेट घेतला.

यामध्ये ड्रायव्हर चाळीस टक्के भाजला आहे. त्यांना मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅस टँकर असल्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी मलकापूर-रत्नागिरी महामार्गावर वाहतूक रोखून धरल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. वाहतुकीची रांग मलकापूर पर्यंत आल्याचे निदर्शनास येत आहे.