वीरवाडी इथं ट्रॅक्टर चा अॅक्सल तुटून अपघात -ट्रॅक्टर चालक ठार
बाबवडे ( दशरथ खुटाळे ) : दि.२७ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारच्या दरम्यान शाहुवाडी तालुक्यातील करुंगळे पैकी वीरवाडी येथील वळणावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर चा अॅक्सल तुटून अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला आहे. सदर घटनेची शाहुवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
करुंगळे पैकी वीरवाडी येथून निनाईदेवी सह साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर हा ऊस घेवून कारखान्याकडे जात असताना वीरवाडी येथील वळणावर ट्रॅक्टरचा अॅक्सल तुटून ट्रॉलीतील ऊस, ट्रॅक्टर चा चालक मंगेश नाना कांबळे (वय २७ वर्षे ) राहणार माण-परळे यांच्या अंगावर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती शाहुवाडी पोलिसांना मिळताच हेड कॉन्स्टेबल मानसिंग खुटाळे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. शव विच्छेदननंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.