गिरोली घाटात रेनॉल्ट कार जळून खाक
कोडोली प्रतिनिधी:-
गिरोली ता.पन्हाळा घाटात रेनॉल्ट कारने अचानक पेट घेऊन झालेल्या जळीतात कार पूर्ण जळून खाक झाली असून, सुमारे बारा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कोडोली पोलिसांनी सांगितले.
सांगली यशवंतनगर येथील कृष्ण रामचंद्र सूर्यवंशी यांनी याबाबत कोडोली पोलिसात वर्दी दिली आहे.
आज रविवार दि.१०रोजी पावणे बाराच्या सुमारास सांगलीहून पन्हाळ्याकडे सूर्यवंशी आपल्या मित्रासमवेत चालले होते. पावणेबारा वास्ता गाडी गिरोली घाटात आलेवर बोनेटच्या खालून धूर येऊ लागला, आणि इंजिनने अचानक पेट घेतला होता. तात्काळ सर्वजन गाडीतून बाहेर पडल्यावर कार्ही वेळातच कार पूर्ण जळून खाक झाली.
मिरज येथील जयश्री जयवंत साळुंखे यांच्या मालकीची ही रेनॉल्ट कार आहे. याबाबत कोडोली पोलिसांत या घटनेची नोंद केली असून हवालदार सुतार तपास करीत आहेत.