शाळेला दहा संगणक भेट देणार – चरण च्या सरपंच सौ रंजना लाड
मलकापूर प्रतिनिधी : चरण तालुका शाहुवाडी येथील शाळेने नेहमीच विद्यार्थ्यांच्या भवितव्यासह गुणवत्तेकडे लक्ष दिले आहे. यामुळे येथील विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा देखील आम्हाला सार्थ आभिमान आहे. म्हणूनच शाळेला भविष्यात दहा संगणक भेट देणार आहोत. असे उद्गार येथील लोकनियुक्त सरपंच सौ.रंजना लाड यांनी काढले.

चरण तालुका शाहुवाडी इथं विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन सरपंच सौ. रंजना लाड उपस्थित होत्या. यावेळी एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीधारक, सारथी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार माजी आदर्श सरपंच के.एन.लाड यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी नूतन सरपंच रंजना लाड पुढे म्हणाल्या कि, या शाळेचे विद्यार्थी आजपर्यंत विविध क्षेत्रात चमकले आहेत. या शाळेने नेहमीच आपली गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

यावेळी प्रज्ञा शोध परीक्षेत व मंथन परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सरपंचांनी शुभेच्छा दिल्या, तसेच शिक्षकांचे देखील कौतुक केले.

यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य प्रा. प्रदीप चरणकर यांनी शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून शाळेस अबॅकस चे साहित्य भेट म्हणून दिले.

यावेळी माजी सरपंच के.एन. लाड, विस्तार अधिकारी सदाशिव थोरात, रमेश डोंगरे, सौ. संजीवनी सुर्वे मॅडम, सावे प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका सौ.शोभा पाटील मॅडम, यांनी मनोगते व्यक्त केलीत.

यावेळी जयसिंग पाटील, सौ. मनीषा पाटील, डॉ. प्रभाकर कांबळे, मुख्याध्यापक संजयकुमार काळे, एस.के. पाटील सर, नामदेव खुटाळे सर, कविता मगदूम मॅडम, सुतार मॅडम, माळी मॅडम, माळी सर, विजय डोंगरे सर, या सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन लाभाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.के. पाटील सर, यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक संजयकुमार काळे यांनी मानले.