शाहुवाडी ग्रामोद्योग संघाच्या चेअरमन पदी आदिनाथ भावके, तर व्हा.चेअरमन पदी अशोक कुंभार यांची निवड
बांबवडे : वाडीचरण तालुका शाहुवाडी येथील श्री आदिनाथ शामराव भावके यांची शाहुवाडी तालुका वि. का. सह. ग्रामोद्योग संघ मर्या. शाहुवाडी च्या चेअरमन पदी, तर अशोक धोंडीराम कुंभार यांची व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


या निवडी वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री युसुफ शेख , तर सचिव म्हणून सुरेश शेवडे यांनी काम पाहिले.

यावेळी संचालक मंडळ शामराव बाबुराव कांबळे, ज्ञानदेव केशव लोहार, विनोद ज्ञानदेव कुंभार, नंदकुमार नामदेव साठे, सौ. राजश्री राजेंद्र सातोशे, सौ. अनुराधा राजेंद्र यादव, वंदना राजाराम कांबळे उपस्थित होते. तसेच संस्थेचे माजी चेअरमन राजाराम सादु बंडगर, मधुकर शंकर लाड हि मंडळी सुद्धा उपस्थित होती.

संस्थेच्या नूतन निवडीबद्दल तालुक्यातून नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन तसेच संचालक मंडळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, व एसपीएस न्यूज च्या वतीने देखील नूतन पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.