शिराळा गावात ” अमोघ ” भात जोमात : राहुल खबाले यांची मेहनत फळाला
शिराळा प्रतिनिधी : शिराळा येथील सुशिक्षित व प्रगतशील शेतकरी राहुल खबाले यांची भात शेती जोमात आलेली आहे. शिराळा हे भात पिकाचे माहेर घर आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये भाताचे वाण – अमोघ. क्षेत्र 20 गुंठे.. मोरणा धरण परिसर 32 शिराळा येथे लावले आहे. पावसाने ताण दिल्यावर शेतामध्ये असणाऱ्या स्वतःच्या विहिरीतील पाणी देऊन हे डौलदार पीक आणले आहे.
वीस गुंठे क्षेत्रात कमीत कमी 35 ते 40 क्विंटल एवढे भाताचे उत्पन्न अपेक्षित आहे. मे महिन्यामध्ये धुळवाफेवर भाताची पेरणी शिराळा गावांत पारंपरिक पद्धतीने होते. मे महिन्याच्या अखेरीला किंवा जून च्या पहिल्या आठवड्यात पडणाऱ्या वळीव पाऊसात भाताची उगवण होते. शिराळा गावातील प्रगतशील शेतकरी राहुल महादेव खबाले यांनी त्यांच्या मोरणा धरण परिसरात बी जात-” अमोघ ” जातीच्या भात रोपची पेरणी करून २०गुंठे क्षेत्रात अत्यंत चांगल्या पद्धतीने भात शेतीचे लागण .केली आहे. भात पिक जोमदार आल्यामुळे परिसरातील सर्व शेतकरी भात शेती पाहण्यास जात आहेत.
मे-जून महिन्यात पाउस कमी प्रमाणात पडून सुध्दा राहुल खबाले यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे भात पिकांची वाढ केली आहे. शिराळा तालुका हा भात पिकांचे माहेर घर आहे. शिराळा तालुक्यात रत्ना चोवीस, रत्ना एक हजार एक, सह्याद्री, इंद्रायणी, कुसळे, कावेरी अशी अनेक जातीची संकरित भातेही पेरली जातात. मात्र शिराळा येथील प्रगतशील शेतकरी राहुल खबाले यांनी बी-जात अमोघ भात पीक जोमात केलेले आहे. हा शिराळा गावात चर्चेचा विषय बनला आहे.