राजकीयसामाजिक

श्री मानसिंग भाऊ नाईक यांचा वाढदिवस आरोग्य शिबिराने संपन्न

शिराळा प्रतिनिधी(संतोष बांदिवडेकर) :अंत्री बुद्रूक (ता. शिराळा) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगभाऊ नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त (ता. 4) रोजी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. त्याचे उद्घाटन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते फीत कापून झाले.


यावेळी ‘विश्वास’चे संचालक बाळासाहेब पाटील, यशवंत ग्लुकोजचे संचालक प्रकाश पाटील, सरपंच सुजाताताई पाटील, उपसरपंच राजेश चव्हाण, निगडीचे सरपंच गणपती भालेकर, विलास चौगुले, डॉ. गणेश राजमाने, विश्वास कामगार युनियनचे उपाध्यक्ष विजय पाटील, राष्ट्रवादी युवकचे अनिकेत कदम, पाडळेवाडीचे माजी पोलिस पाटील विश्वास पाटील, माजी उपसरपंच सुनील पाटील, दीपक पाटील आदी मान्यवर व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व सहकारी, रुग्ण, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने जिल्हाध्यक्ष श्री. नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!