साळशी इथं महाराजस्व अभियान संपन्न
बांबवडे : शासकीय योजना जनहितार्थ राबविण्यासाठी महाराजस्व अभियान राबवले जात आहे. ग्रामीण वाडी वस्ती वरील जनतेने या शासनाच्या उपक्रमाचा लाभ घ्यावा. असे मत प्रतिपादन शाहुवाडी चे प्रांत अधिकारी निखील खेमनार यांनी केले.

साळशी तालुका शाहुवाडी येथील महाराजस्व अभियान कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांनी केले.

यावेळी बोलताना श्री खेमनार म्हणाले कि, हे अभियान घरा घरात पोहचले पाहिजे. याला जनतेचा प्रतिसाद मिळणे, आवश्यक आहे. तरच शासनाचे उद्दिष्ट सफल होईल. तालुक्यात इतर ठिकाणी राबविलेल्या या अभियानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी बोलताना तहसीलदार रामलिंग चव्हाण म्हणाले कि, शाहुवाडी तालुका दुर्गम व डोंगराळ आहे. लोकांची कामे व्हावीत, हेच उद्दिष्ट असून, सकारात्मक दृष्टीने समन्वय राखून हे अभियान यशस्वी करू. त्यामुळे सर्व शासकीय विभाग प्रमुखांना उत्साह लाभेल.

यावेळी जि.प. सदस्य विजयराव बोरगे, माजी शिक्षण सभापती महादेवराव पाटील, यांनी मनोगते व्यक्त केलीत.

यावेळी सरपंच आनंदा पाटील, उप सरपंच संदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुंदर पाटील, ग्रामसेवक जे.एन. गिरी गोसावी, तलाठी वळीवडेकर, सेतू संचालक राजेंद्र डोंगरे, मंडल अधिकारी अतुल नलवडे, डॉ. आनंदा पाटील, कृषी अधिकारी अभिजित जेधे, माजी सरपंच के.एन. लाड, आदींसह विविध विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी रेशन कार्ड, व विविध दाखले वाटपासह विविध विभागाकडून एकूण २१६७ लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.