सावे गावाला जाणारा मार्ग पाणी आल्याने बंद
बांबवडे : सावे तालुका शाहुवाडी येथील चौगुलेवाडी येथील रस्त्यावर ओढ्याचे पाणी आल्याने, सावे गावाचा मुख्य रस्त्याशी म्हणजेच कोल्हापूर – मलकापूर रस्त्याला जोडण्याचा मार्ग बंद झाला आहे.

सावे तालुका शाहुवाडी या गावाला जोडण्यासाठी मुख्य रस्ता म्हणजेच कोल्हापूर – मलकापूर महामार्ग हा आहे. परंतु सावे फाट्याहून गावाकडे जाताना चौगुलेवाडी इथं वाटेत ओढा आडवा येत आहे. या ओढ्याला पाणी अधिक प्रमाणात आल्याने ओढ्यावरून पाण्याचा प्रवाह वहात आहे. त्यामुळे सावे गावाला जाणारा हा मार्ग बंद झाला आहे. दरम्यान गावात जाण्यासाठी पाटणे मार्गे ग्रामस्थांना जावे लागत आहे.