२१ व्या शतकातील महिलांचा सार्थ अभिमान- सरपंच रंजना लाड
बांबवडे : २१ व्या शतकात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, आणि आपले कौशल्य दाखवून देतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे मत प्रतिपादन चरण गावच्या सरपंच सौ, रंजना कृष्णात लाड केले.

चरण तालुका शाहुवाडी इथं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ग्रामपंचायत चरण इथं साजरी करण्यात केली. या अनुषंगाने महिला व बालविकास विशेष योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्याबद्दल सौ पूजा चेतन डोंगरे, सौ. संगीता दीपक पाटील, यांचा सामाजिक कार्यक्रमामध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच सौ. सुशीला कृष्णात पाटील, संगीता संजय किटे, यांनाही सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सौ रंजना कृष्णात पाटील सरपंच, उपसरपंच विजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच के.एन. लाड, जयसिंग पाटील, ग्रा. पं. सदस्य कोमल चौगुले, कल्याणी शिंदे, अंगणवाडी सेविका कविता पाटील, सौ. नंदा लाड, विजयमाला पाटील, संगीता किटे, सुशीला पाटील, सुषमा कांबळे, रेखा साळुंखे, पूजा किटे, स्वाती माने, स्वयंसेविका स्वाती शिंदे, अर्चना लाड, शांता डोंगरे,संगीता जगताप, या महिलांनाही सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्रामसेवक पी.एल. सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन कविता पाटील यांनी केले.