भाडळे खिंड जवळ दुचाकीच्या अपघातात तरुण ठार
बांबवडे ( प्रतिनिधी ) : भाडळे खिंड जवळ खुटाळवाडी च्या हद्दीत रविवारी रात्री ११ वाजनेच्या सुमारास दुचाकीस्वाराचा गाडी घसरून झालेल्या अपघातात, उमेश महादेव भिंगार्डे वय (३५ वर्षे )राहणार सातवे पैकी शिंदेवाडी ता.पन्हाळा यांचा मृत्यू झाला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उमेश भिंगार्डे हे लग्न कार्यानिमित्त सरूड-सागाव ला निघाले होते. शाहुवाडी तालुक्याच्या सुरुवातीलाच असलेली भाडळे खिंड पार केल्यानंतर, त्यांची दुचाकी क्र.MH-09-CP-0867 रस्त्यावरून घसरली. त्यामुळे ते पडले, व त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई,पत्नी व चार वर्षांची मुलगी आहे.