गोगवे त धाडसी दरोडा : सुदैवाने जीवितहानी नाही
बांबवडे ( प्रतिनिधी ) : गोगवे तालुका शाहुवाडी इथं कोल्हापूर- रत्नागिरी रोड वर असलेल्या सद्गुरू हरदेव बेकरी मध्ये रात्री पावणेदोन च्या सुमारास तीन दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला. यात केवळ दोन तोळ्यांची सोन्याची चेन घेवून चोरट्यांनी पोबारा केला. दरम्यान तीन दरोडेखोर कैद झाले, पण सीसी टीव्ही मध्ये.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गोगवे स्थानकासमोर राजाराम ज्ञानू पाटील ( वय ६० वर्षे ) यांच्या मालकीची सद्गुरू हरदेव बेकरी आहे. या बेकरीत कामगारांसहित चार जण रात्री झोपण्यास असतात. मालक स्वतः बेकरी बाहेर झोपले होते. तर दोन कामगार त्यांच्या मालकीच्या टेम्पो त झोपले होते. तसेच बेकरी च्या आत दोघे जण झोपले होते. रात्री पावणेदोन च्या सुमारास तीन इसम बनियान व पँट घालून आले होते. हे दरोडेखोर बेकरीच्या मागील बाजूने म्हणजेच शेताकडच्या बाजूने आले होते. सुमारे एक तास हे तिघे शोधाशोध करत होते. परंतु त्यांना विशेष काही मिळाले नाही. पण बाहेर जे राजाराम पाटील झोपले होते. त्यांच्या अंगावरील पांघरून झोपेत निघाल्याने त्यांच्या गळ्यात असलेली सोन्याची चेन दरोडेखोरांच्या नजरेस पडली. काही नाही तर चेन सही, असे म्हणून त्यांनी झोपलेल्या राजाराम पाटील यांच्या गळ्यातील चेन कोणत्यातरी साहित्याच्या सहाय्याने कट केली, आणि घेवून जात असता पाटील यांना जाग आली. त्यांनी चोरांचा पाठलाग केला. परंतु अंधार असल्याने बांधावरून पाय घसरून ते पडले,आणि चोरांना पसार व्हायला आयती संधी मिळाली.
दरम्यान रात्री च्या वेळी दोन- ते तीन ठिकाणी त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे नाग्रीकातून बोलले जात आहे. अशाप्रकारे सीसीटीव्ही त चोर पकडण्याची , हि तालुक्यातील पहिलीच घटना असावी. ऐन उन्हाळ्यात महामार्गावर असलेल्या या बेकरीत अशाप्रकारचा दरोडा पडल्याने, परिसरातील नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत शाहुवाडी पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही.
Good News inShahuwadi
Thanks