केर्ली जवळील एसटी-ट्रक च्या अपघातात १ ठार तर १६ जखमी
आसुर्ले : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर दुपारी ३ वाजनेच्या दरम्यान झालेल्या एसटी व ट्रक च्या अपघातात एसटी चालक अर्जुन सदाशिव दुधाने (वय ४५ वर्षे ) रहाणार वरणगे पाडळी तालुका करवीर यांचा मृत्यू झाला असून, वाहकासह १६ प्रवाशी जखमी झाले आहेत.
आज दि.२५ जुलै रोजी दुपारी तीन वाजनेच्या दरम्यान केर्लीजवळ कोल्हापूर-पन्हाळा एसटी व गॅस सिलेंडर ट्रक ची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. या अपघातात ट्रक चालक देखील जखमी झाला आहे.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे : १) प्रकाश केरबा खैरे (वय ३८ वर्षे ) रहा.मुरगूड, २)एसटी वाहक मुबारक शमशुद्दीन मोकाशी वय ५४ वर्षे ),३) सागर बळवंत पोवार (वय २६ वर्षे )रहाणार आसुर्ले ,४) श्रीराम शंकर साळोखे (वय ६८ वर्षे )रहाणार बोरपाडळे, ५) दत्तात्रय ज्ञानू वाळूंज (वय ५९ वर्षे ) रहाणार केर्ले, ६) सौ.भारती मोहन भोसले (वय ५८ वर्षे )रहाणार पन्हाळा, ७) संभाजी शिवाजी तडाखे (वय ४४ वर्षे ) रहाणार जाफळे ८)मीना संभाजी तडाखे (वय ४१ वर्षे) रहाणार जाफळे ९) पांडुरंग बापू पोवार (वय ६५ वर्षे) रहाणार पडवळ वाडी ,१०) लक्ष्मी कोंडीबा मोहिते (वय ५५ वर्षे ) रहाणार सांगरूळ, ११) दशरथ केशव मदने (वय ४० वर्षे ), रहाणार देवाळे १२) शरद बापुसो मोळे (वय २५ वर्षे ) रहाणार आसुर्ले-पोर्ले १३) अभिलाषा अशोक कोरे (वय २० वर्षे ) रहाणार पन्हाळा १४) बाळकृष्ण महादेव शेटे-पाटील (वय ६० वर्षे )रहाणार पन्हाळा १५ ) मोहन वसंतराव भोसले (वय ६८ वर्षे) रहाणार पन्हाळा, १६) सरस्वती श्रीराम साळोखे (वय ५५ वर्षे ), रहाणार पन्हाळा.