अजितदादांची सेनेला सरकार स्थापनेची ऑफर
मुंबई : राष्ट्रवादी नेते मा.अजितदादा पवार यांनी शिवसेनेला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर थेट सरकार स्थापनेची ऑफर दिली आहे.
विधानसभेच्या अधिवेशनात मा.अजित दादांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला जाब विचारत चांगलेच धारेवर धरले आहे. दररोज नवनवीन निकष लावण्याऱ्या सरकारला नेमकी कर्जमाफी द्यायची आहे कि नाही. शिवसेना सांगतेय २०१७ पर्यंत कर्जमाफी होईल. आमच्यासोबत या , तुमचे सदस्य आणि आमचे मिळून सरकार स्थापन करू.प्रस्ताव मंजूर करून टाकू. होऊन जाऊदे एकदाच.आणि हि सर्व जमवाजमव करून पण शिवसेना कर्जमाफी द्यायला तयार आहे का? असा संतप्त सवालही केला. यामुळे राष्ट्रवादी व सेना यांचा कलगी तुरा अधिवेशनात चांगलाच रंगला.