ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं हृदय विकाराने निधन
बांबवडे ( प्रतिनिधी ) ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ५७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या अचानक एक्झिट ने नाट्य सृष्टी, तसेच बॉलीवूड क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रीमा लागू यांची तब्येत काही दिवस बरी नव्हती. दरम्यान काल त्यांच्या छातीत दुखू लागल्याने, त्यांना कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
रीमालागु यांनी नाट्यसृष्टी सोबतच बॉलीवूड मध्ये अनेक नायक,नायिकांची ‘आई ‘ ची भूमिका साकारली होती. त्यातल्या त्यात ‘मैने प्यार किया ‘, ‘ वास्तव ‘ मधील ‘ रघुभाय ‘ ची कणखर आई हि भूमिका सर्वांनाच भावली होती. सिने सृष्टी ची ‘ आई ‘ आता पडद्याआड गेली आहे.