नूतन समाजकल्याण सभापती विशांत महापुरे यांचे कोडोली गावात जलोषी स्वागत
कोडोली प्रतिनिधी(सनी काळे) :
कोडोली ता.पन्हाळा येथील विशांत महापुरे यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेत समाजकल्याण सभापती पदी निवड झाल्याबद्दल कोडोली मध्ये फाटकेची आतिषबाजी करत डॉल्बीच्या आवाजात मिरवणूक काढण्यात आली.
जिल्हा परिषदसाठी कोडोली मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे भीमराव साठे यांचा पराभव करून माजी मंत्री विनयरावजी कोरे यांच्या जनसुराज्यशक्ती पक्षातून विशांत महापुरे हे निवडून आले होते.त्यांची आज कोल्हापूर येथे समाजकल्याण सभापती म्हणून निवड झालेबद्दल कोडोली गावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले,तसेच फटाक्याची आतिषबाजी करत डॉल्बी लावून गुलालाची उधळण करत मिरावणूक काढण्यात आली.यावेळी बी.टी. साळुंखे सर,सरपंच नितीन कापरे,माजी ग्रा.सदस्य अमर पाटील तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.