उद्या दि.२५ मे रोजी बांबवडे सरपंच निवड
बांबवडे : उद्या दि.२५ मे २०१७ रोजी बांबवडे ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाची निवड होणार आहे.
बांबवडे तालुका शाहुवाडी येथील सरपंच पदाचा राजीनामा श्री विष्णू यादव यांनी शाहुवाडी पंचायत समिती च्या सभापती सौ. स्नेहा जाधव यांच्याकडे सुपूर्द केल्याने येथील सरपंच पद रिक्त झाले होते. दरम्यान गावातील जनावरांचा बाजार जवळील दुकान गाळे लिलाव प्रक्रियेतून हा वाद धुमसत होता. या अगोदर जिल्हापरिषद निवडणूक काळात विष्णू यादव व गटाचे नेते कर्णसिंह गायकवाड यांच्यात उमेदवारी वरून वाद उत्पन्न झाला. सदर वादामुळे यादव यांनी गटाच्या विरोधात जाण्याचा पवित्र घेतला. यावरून गावात शाब्दिक वाद होत होते. दरम्यान दुकान गाळे लिलाव प्रक्रिया पुढे आली. यातून साळशी व बांबवडे असे प्रकरण रंगू लागले. याचे पर्यावसान विष्णू यादव यांच्या सरपंच पदाच्या राजीनाम्यात झाले.
सध्या सरपंच पदाचे प्रमुख दावेदार म्हणून उपसरपंच गजानन निकम यांचे नाव पुढे येत आहे.