अस्मिता कांबळे यांना पीएचडी
शिराळा,: नाटोली (ता.शिराळा)सौ.अस्मिता सागरकुमार कांबळे यांना पी.एच.डी मिळाली असून, त्याचा ‘ रोल ऑफ हायपर मॉडीफाइड न्यूक्लीओसाईडस ऑकर ऍट दी व्होबल (34) पोजीशन ईन दी अँटीकोडॉन लूप ऑफ टीआरएनए ‘ या विषयावरील जागतिक कीर्तीच्या प्लॉस वन या जरनलमध्ये शोध निबंध प्रसिद्ध झाला आहे.
हे जरनल अमेरिका आणि इंग्लंड मधून नुकतेच प्रसिद्ध झाले. यामुळे संशोधन क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून कौतुक होत आहे. त्यांना डॉ. के.डी. सोनवणे यांचे मार्गदर्शन व विभागप्रमुख डॉ ए. यू.अरविंदेकर यांचे सहकार्य लाभले.
यापूर्वी अस्मिताने बायोइन्फर्मेटिक्स मध्ये एमटेक केले आहे.