खा.उदयनराजे यांना अटक व सुटका
सातारा : खा.उदयनराजे यांच्यावर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने खा.उदयनराजे हे सातारा पोलिसांकडे हजर झाले होते. यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले. यानंतर त्यांची प्रकृती खराब झाली. यामुळे त्यांना तात्पुरता जामीन मंजूर करून रुग्णालयात दाखला केले आहे.
या घटने दरम्यान साताऱ्यात बंद पाळण्यात आला. व राजेंच्या समर्थकांनी पुकारलेल्या बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सातारा शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.