आंबेवाडी-शिरसी पैशाच्या देवाण-घेवाणी वरून मारहाण
शिराळा : प्रतिनिधी :
आंबेवाडी-शिरसी ता.शिराळा येथे धाब्यावर पैशाच्या देवाण-घेवाणी वरून लाथा बुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याच्या कारणावरून फिर्यादी – बाबाजी रंगराव भोसले, यांनी फिर्याद शिराळा पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आंबेवाडी शिरसी येथील एका धाब्यावर १७ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता या घटनेतील संशयित आरोपी १.. सचिन बाबाजी चव्हाण २.. संदिप बाबाजी चव्हाण ३ . अमोल बजरंग चव्हाण ४ . दादा बजरंग चव्हाण सर्व रा. आंबेवाडी ता. शिराळा येथे १७ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वा.चे सुमारास श्री ढाब्या समोर आंबेवाडी गावी घटना घडल्याने आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील जखमी-फिर्यादी स्वतः व किरण जयसिंग महिंद रा. शिरसी येथील आहेत. या गुन्हयात वापरलेले हत्यार – टोकदार फायटर मुळे जखमी झाले आहेत.
आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांचे आदेशाने घटनेचा अधिक तपास पोहेकॉ सुभाष पाटील करीत आहेत.