आपल्या आदर्शवत कामाची पोहच पावती कधी ना कधी मिळतेच – राहुल पाटील
शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर):
कोणत्याही क्षेत्रात आदर्शवत काम करत असाल, तर त्याची पोहोच पावती कधी ना कधी मिळते, असे प्रतिपादन पुण्याचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले.

भेडसगांव ता. शाहूवाडी केंद्र शाळेच्या क्रेंद्रमुख्याध्यापिका सुनंदा मधुकर वायदंडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते
माजी आमदार राजीव आवळे, आष्ट्याचे स. पो. निरीक्षक अण्णासाहेब बाबर, मनमित राऊत, प्रा.डॉ. संजय थोरात,माजी उपसभापती आनंदराव पाटील, निनाईचे संचालक बाजीराव पाटील प्रमुख उपस्थित होते.

सुनंदा वायदंडे ह्या 37 वर्षे 6 महिने इतकी प्रदीर्घ सेवा बाजवून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्यानिमित्त IFS राहुल पाटील व मा.आ. राजीव आवळे यांच्या हस्ते श्रीम.वायदंडे यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला महापुरुषांच्या तसेच दिवंगत प्रा. मधुकर वायदंडे यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी राहुल पाटील पुढे म्हणाले कि, आई-वडिलांच्या नंतर शिक्षक हेच संस्कार घडवण्याचे काम करीत असतात. घरची कौटुंबिक जबाबदारी पार पाडत. आपल्या मुलांना व विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबरच चांगले संस्कार देण्याचे आदर्शवत काम भेडसगावच्या केंद्र मुख्याध्यापिका सुनंदा वायदंडे काकी यांनी केले आहे. अशा विद्यार्थीप्रिय चांगल्या शिक्षकांचा गौरव आपण सर्वांनी केलाच पाहिजे.

माजी आमदार राजीव आवळे म्हणाले कि, प्रामाणिक पणे काम करून कामाप्रति असणारी निष्ठा कशी जपावी हे वायदंडे काकी कडून इतर शिक्षकांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे.
दिवंगत प्रा. मधुकर वायदंडे हे बहुजन तसेच पारधी समाजासाठी आयुष्य खर्ची घातलेले व्यक्तिमत्व होते. त्यांचाच वारसा जपत सुधाकर वायदंडे व दिवाकर वायदंडे हे सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम राबवत आहेत. पुढच्या काळात वायदंडे कुटुंबियांच्या सोबत राहू, असे आ.आवळे यांनी सांगितले.

यावेळी प्रा.डॉ.संजय थोरात, अनुसया दळवी, चंद्रकांत पाटील, शिवाजी माळी, मारुती फाळके आदींनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक दिवाकर वायदंडे, दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पोपट लोंढे, बांधकाम सभापती नामदेव काळे, दिनकर नांगरे, पारधी हक्क अभियानाचे बसवराज चव्हाण, निर्मला पवार, जितेंद्र काळे, टारझन पवार, इंद्रजित काळे, राकेश काळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी. एम. पाटील, शिवाजी कांबळे, कलाशिक्षक डी. एस. कांबळे, आनंदा सुतार, कृष्णात पवार, पांडुरंग जाधव, स्वाती दरबान, युवराज दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा पाटील, प्रास्ताविक दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर वायदंडे तर आभार बसवराज चव्हाण यांनी मानले.