ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील सरुडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यती
शाहूवाडी प्रतिनिधी
शाहूवाडी पन्हाळ्याचे माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त कोपार्डे तालुका शाहूवाडी येथे ,आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांकाचा शिवसेना बाळासाहेब ठाकरे केसरी किताब श्रीकांत पाटील यांच्या बैल जोडणी पटकावला . खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज , आ भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी गाडीमालकांना बक्षीस वितरीत करण्यात आले .
माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोपार्डे येथे उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने दक्षिण विधानसभा संपर्कप्रमुख बाजीराव कळंत्रे ,विजय कारंडे यांच्या विशेष पुढाकाराने आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीत 110 बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या .
प्रथम क्रमांकासाठी एक लाख 1 हजार एकशे 11 रुपये व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे केसरी किताब यासह सात क्रमांकापर्यंत रोख रक्कम व चषक ठेवण्यात आले होते .तर उपतालुका प्रमुख निवास कदम यांच्याकडून प्रत्येक विजेत्या गाडी मालकास संभाजी महाराजांची मूर्ती भेट देण्यात आली .या शर्यतीत प्रथम क्रमांक श्रीकांत नारायण पाटील ,द्वितीय क्रमांक एकनाथ पाटील कणदूर , तृतीय क्रमांक बाळू मामा प्रसन्न , चतुर्थ क्रमांक बाळूमामा प्रसन्न विजू ड्रायव्हर भाटशिरगाव ,पाचवा क्रंमाक दिगंबर नामदेव गुरव कडगाव तालुका भुदरगड , सहवा क्रमांक संकेत ज्योतिबा खामकर पोळगाव तालुका आजरा ,तर सातवा क्रमांक विभागून देण्यात आला यामध्ये जोतिबा प्रसन्न करंजफेण ,पार्थ पाटील भाडळे, व बाळूमामा प्रसन्न भागाईवाडी .याशिवाय सर्व सहभागी गाडीमालकांना विषय सर्वांचा देण्यात आले .सकाळी दहा वाजता माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, जिल्हा ब
[6:14 pm, 17/2/2025] Lashkar sir: बँके संचालक रणवीरसिंह गायकवाड, बाजीराव कळंत्रे , विजय कारंडे, विक्रम चौगुले, आनंदा चौगुले यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित मैदानाचे उद्घाटन करण्यात आले .
तालुक्यात प्रथमच डिजिटल घड्याळाच्या माध्यमातून बैलगाडी शर्यतीचे नियोजन केल्याने शौकिनांच्यातून समाधान व्यक्त होत होतं
दरम्यान खासदार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर यांचा विशेष गौरव करण्यात आला यावेळी आमदार भास्कर जाधव, उदय साखर चे चेअरमन मनसिंगराव गायकवाड , डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, युवराज पाटील , यांच्यासह उद्योगपती वाशिम भाई , धनंजय पाटील, सचिन पवार, सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक बाजीराव पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख आनंदा भेडसे , हिंदुराव आळवेकर, माजी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील , शिवसेना जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी ,माजी पंचायत समिती सदस्य जालिंदर पाटील, माजी उपसभापती दिलीप पाटील, नामदेव पाटील, सुरेश पारळे , शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता पवार , प्राचार्य डॉ एच डी दिंडे , उपप्राचार्य टी बी पाटील, मुख्याध्यापक जी एस पाटील, ए जी कांबळे ,बी ए कांबळे, आदींच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर बैलगाडी शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते .मैदानाच समालोचन दत्ता वारकरी , प्रमोद पाटील ,रणजीत पाटील, विजय बुवा सांगलीकर यांनी केले .
बैलगाडी शर्यत मैदान यशस्वी करण्यासाठी कोपार्डे येथील शिवसेना उबाठा गटाचे सर्व कार्यकर्ते यांच्या सरूड महाविद्यालयाचे अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .