डोणोली चे अनेक कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षात सामील
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील डोणोली येथील सेवा संस्थेचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्यांसह कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आहे.

शाहुवाडी – पन्हाळा तालुक्यात आमदार डॉ. विनय कोरे यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. यामुळे गट तट सोडून, शाहुवाडी तालुक्याच्या विकासकामांसाठी आम्ही जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करीत आहोत. असे कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच येथील शिवसैनिकांनी देखील जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी डोणोली विकास सेवा संस्थेचे चेअरमन रवींद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव शिंदे, निवास शेळके, रामचंद्र पाटील, सेवा संस्थेचे संचालक रामचंद्र आनंदा शेळके, युवा नेते गोरक्ष आनंदा पाटील, बापू सातपुते, महेंद्र कांबळे, स्वप्नील शेळके, मयूर कांबळे, दत्तात्रय मगदूम, प्रशांत पाटील, सर्जेराव पाटील, चंद्रकुमार शेळके, रोहन मगदूम, आनंदा खुटाळे, हर्षवर्धन कदम, सुनील पाटील, अनिल भिकाजी पाटील, जयदीप सीताराम बुरुगडे, यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते अॅड. राजेंद्र पाटील, वारणा सह. साखर कारखान्याचे संचालक सुरेश पाटील (बापू ), पन्हाळा पंचायत समिती चे माजी सभापती अनिल कंदुरकर (आप्पा), विठ्ठल खुटाळे, डोणोली चे उपसरपंच संदीप शेळके, विकास पाटील, विजय शेळके, अनिल पाटील, निवास शेळके, अशोक कुंभार, संदीप शेळके यांच्यासह अन्य मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.