पाचुंब्रीत कृषी विभागाकडून सोयाबीन बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक
शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर): पाचुंब्री ( ता शिराळा ) येथील शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी शिराळा कृषी विभागाकडून पाचुंब्री गावची सोयाबीन पीक प्रात्यक्षिक साठी निवड करण्यात आली होती. शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक अंतर्गत १० हेक्टर क्षेत्रासाठी के डी एस ७२६ या वाणाची ५५० किलो सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. इच्छुक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा , असे आवाहन कृषी सहाय्यक ज्योती बदडे यांनी केले आहे.
सोयाबीन पिक लागवडीची बीज प्रक्रियेचे अनन्यसाधारण आहे . यावेळी सोयाबीन बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले . पेरणीपूर्व सर्व शेतकऱ्यांनी बियाणाची बीज प्रक्रिया महत्त्वाची आहे . सुपीक जमीन व चांगली व्यवस्थापन केल्यास अधिक उत्पादन मिळते . सरासरी उत्पादन हेक्टरी २० ते २५ क्विंटल आहे. यावेळी सरपंच अमोल पाटील , उपसरपंच चंद्रकांत पाटील , सचिन नागरे , संजय माने, सुनील पाटील , प्रमोद पाटील , महादेव पाटील , सदाशिव पाटील , संदीप पाटील , दिलीप ठोंबरे , राजेंद्र पाटील, ग्रामसेवक संदीप कुंभार उपस्थित होते