congratulationsराजकीयसामाजिक

भारत राष्ट्र समिती च्या शाहुवाडी, पन्हाळा समन्वयक पदी मयूर मोहिते यांची निवड

बांबवडे : भारत राष्ट्र समिती पक्षाच्या शाहुवाडी, पन्हाळा समन्वयक पदी मयूर रघुनाथ मोहिते यांची पक्षाच्या वतीने निवड करण्यात आली असून, तशा आशयाचे नियुक्तीपत्र देखील कोल्हापूर जिल्हा समन्वयक तोहीद बक्षु, तसेच महिला आघाडी च्या श्रद्धा महागावकर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.


यावेळी अन्य निवडी देखील संपन्न झाल्या. बाळासाहेब गणपतराव परळीकर यांची शाहुवाडी पन्हाळा समन्वयक उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. मानसिंग जयसिंग आडके, यांची सचिव पदी, तर राहुल आनंदा मोहिते यांची कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. रामदास रामचंद्र सुतार यांची शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी,तर विजय विलास मोहिते यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.


भारत राष्ट्र समिती चे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रभारी समन्वयक के. वामशीधस्तव यांच्या मार्गदर्शनाखाली संजय दिनकर पाटील यांच्या सहमतीने या निवडी संपन्न झाल्या.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!