“मयूर कदमबांडे” यांच्या कर्तुत्वाला आकाशाची उंची लाभो;हार्दिक शुभेच्छा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ” यशराज ऑप्टीकल्स ” चे मालक कदमबांडे बंधू यापैकी मयूर कदमबांडे यांना, त्यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज च्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
यशराज ऑप्टीकल्स गेली सोळा वर्षे आपल्या कष्टातून आधुनिक पद्धतीच्या सहाय्याने गोरगरीब जनतेला माफक दरात आपली सुविधा पुरवीत आहेत. ओंकार व मयूर हे दोन्ही बंधू या व्यवसायावर नितांत प्रेम करतात, आणि प्रती वर्षी नवीन आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न करतात.
मयूर नंदकुमार कदमबांडे यांनी या क्षेत्रात पदवी संपादन केली आहे. त्याचबरोबर ग्राहकांशी असलेला त्यांचा सलोखा हा देखील तितकाच महत्वाचा आहे. याचबरोबर समाजाशी बांधिलकी ठेवून हे दोन्ही बंधू असतात. प्रत्येक सामाजिक, क्रीडा क्षेत्र, तसेच व्यावसायिक क्षेत्रात हे दोन्ही बंधू नेहमी अग्रस्थानी असतात. नोकरीपेक्षा आपल्या व्यवसायातून त्यांनी आपले कर्तुत्व आजवर सिद्ध केले आहे. अशा कर्तुत्ववान मयूर यांचा आज वाढदिवस आहे. निश्चित यानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो. तसेच त्यांच्या कर्तुत्वाला यशाची उंची लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. पुनश्च मयूर कदमबांडे यांना वाढदिवसाच्या भरघोस शुभेच्छा.