माजी आम.राऊ धोंडी पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन : भावपूर्ण श्रद्धांजली
शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्याचे माजी आमदार श्री राऊ धोंडी पाटील राहणार पेरीड तालुका शाहुवाडी यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

माजी आम. राऊ धोंडी पाटील यांनी शिक्षणाची गंगा रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात आणली, आणि इथला तत्कालीन तरुण वर्ग सुशिक्षित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तसेच स्वातंत्र्य पूर्व काळात इंग्रज सरकार विरोधात पत्री सरकार स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.

अशा श्री राऊ धोंडी पाटील यांचे आज पहाटे निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.