शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
आंबा प्रतिनिधी ( प्रकाश पाटील ) : राज्यातील शाळा गुरुवार दि.१५ जून पासून सुरु झाल्या आहेत. शाळांच्या पहिल्याच दिवशी सांस्कृतिक परंपरा जपत आंबा पंचक्रोशीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

काही शाळातून विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल-ताशांच्या ठेक्यावर करण्यात आले, तर कुठे बैलगाडीतून मिरवणुकीने विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात आले. यावेळी विद्यार्थी सुद्धा प्रफुल्लीत मनाने आनंदी वातावरणात शाळेत प्रवेशकर्ते झालेत.

नवे कपडे, नवे दप्तर, नवी पुस्तके, नवे मित्र या वातावरणाने विद्यार्थी वर्ग भारावून गेला. विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी शाळेला उदंड प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.

शाळा नियमित सुरु झाल्याने बस स्थानकावर सुद्धा विद्यार्थ्यांची गर्दी पहायला मिळत होती.