शाहुवाडी च्या पाठींब्या बाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून, निर्णय घेणार – श्री रणवीरसिंग गायकवाड संचालक केडीसिसी
बांबवडे : सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर शाहुवाडी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून, आम्ही कोणाच्या पाठीशी आहोत, हे स्पष्ट करू. असे मत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

सध्याच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडी पाहता, नेमके काय घडतंय, हे समजणे कठीण होत आहे. एकीकडे अवघा पक्ष उभा करणारे पॉवर मॅन शरद पवार साहेब वयाच्या ऐंशी नंतर सुद्धा तरुणांना लाजवेल, अशा उत्साहात आश्वासक चेहरा म्हणून,समोर येत आहेत. तर अजितदादा पवार एकेकाळचे उत्तराधिकारी समजले जात असताना, त्यांनी केलेली भाजप शी युती हि केवळ सत्तेसाठी आहे का ? कि, या मागे आणखी कोणते राजकीय धोरण आहे, हे समजणे, सध्या कठीण जात आहे.

जरी असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी चे खंदे समर्थक समजले जाणारे जिल्हा बँकेचे चेअरमन श्री हसन मुश्रीफ साहेब हे मंत्री झाले. या अनुषंगाने बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांनी मुश्रीफ साहेबांचे अभिनंदन देखील केले आहे.

यावरून शाहुवाडी ची राष्ट्रवादी कॉंग्रेस नेमकी कोणाला पाठींबा देणार ? हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यातच आहे.