संभाजीराजे छत्रपती यांना आज अटकेची शक्यता
बांबवडे : ” अतिक्रमण मुक्त विशाळगड ” च्या सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामध्ये काल दि. १४ जुलै२०२४ रोजी अतिक्रमण मुक्त विशाळगड या मुद्द्यावर संभाजीराजे यांनी नेतृत्व केले होते. दरम्यान या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अज्ञातांनी तिथं असलेल्या दुचाकी, चार चाकी वाहनांची तोडफोड केली, तर काही रहिवाशांची घरे पेटवली. यामुळे संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेकांवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत.
दरम्यान संभाजीराजे शाहुवाडी कडे रवाना होत असल्याचे समजते.
त्याच अनुषंगाने आज संभाजीराजे यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान याच मुद्द्यावर अनेक तरुण कोल्हापूरहून शाहुवाडी कडे येण्यास निघाले असल्याचे समजते. या जमावामुळे आणखी काही अरिष्ट घडू नये, याची काळजी प्रशासन घेईल, याची अपेक्षा आहे.