सचिन पाटील यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील युवा उद्योजक श्री सचिन पाटील थेरगावकर यांना पंचक्रोशीतील तरुणाईच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्य्जू च्या वतीने देखील त्यांना लाख लाख शुभेच्छा.
सचिन पाटील हे व्यक्तिमत्व निष्ठावंत असून, माजी आमदार सत्यजित पाटील यांचे ते कट्टर समर्थक आहेत. सध्या तरुणाई नोकरीच्या मागे लागत आहे. परंतु सचिन पाटील हे व्यक्तिमत्व स्वत: वेगळी वाट चोखाळणारे व्यक्तिमत्व असून, त्यांनी प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करणे पसंत केले आहे.
श्री साई केदार एंटरप्राय्झेस, एम.आय.डी.सी. शिरोली इथ त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला. ते गव्हर्मेंट काँट्रॅक्टर असून मेहनती आहेत. सद्यस्थितीत तरुणाई ने स्वत:चा व्यवसाय उभा करून आपलं स्वत:चं अस्तित्व निर्माण करणे, हि काळाची गरज आहे. नेमकं या तरुणाने हे उचललं, आणि स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं. सचिन पाटील हे सत्यजित आबांचे समर्थक आहेत. परंतु फक्त राजकारण न करता समाजकारणासाठी राजकारण वापरावे, असे त्यांचे मत आहे.
असं हे व्यक्तिमत्व आयुष्याची आणखी एक पायरी चढत आहे. अशावेळी त्यांच्या मित्रपरिवाराकडून त्यांना शुभेच्छा मिळणं गरजेचं आहे. ते त्यांना आज मिळत आहे. असो. त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, आणि त्यांना दीर्घायुरोग्य लाभावं, याच त्यांना शुभेच्छा, त्यांच्या आप्तेष्ट व मित्र परिवाराने दिल्या आहेत.
पुनश्च साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने लाख लाख शुभेच्छा.