सौ सुषमा संदीप पाटील यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा- ए वन कंस्ट्रक्शन जेऊर
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी जि. कोल्हापूर येथील रणरागिणी महिला बचत गट च्या अध्यक्षा सौ सुषमा संदीप पाटील यांना ” ए वन कंस्ट्रक्शन ” जेऊर तालुका पन्हाळा चे मालक अमोल पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.

सौ सुषमा पाटील मॅडम या सध्या बांबवडे नागरी सह. पतसंस्था मध्ये कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी आपला रणरागिणी महिला बचत गट उत्कृष्ट पणे चालविला असून, याबद्दल त्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या बचत गट संस्थेंतर्गत सलग तीन वर्षे पहिला क्रमांक मिळत आला आहे.

याचबरोबर शाहुवाडी पंचायत समिती च्या वतीने देण्यात येणारा हिरकणी पुरस्कार देखील त्यांच्या बचत गटाला मिळाला आहे. यामागे पाटील मॅडम यांचे कौशल्य आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी आपले ” हिरकणी ” पुरस्काराचे नाव त्यांनी सार्थ ठरवले आहे.

आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना ए वन कंस्ट्रक्शन जेऊर यांच्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने देखील सौ सुषमा संदीप पाटील रहाणार बांबवडे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.