भक्ती जाधव “प्रज्ञाशोध” मध्ये जिल्हात तिसरी
कोडोली प्रतिनिधी:-
आदर्श विद्यामंदिर,नागदेववाडी येथे इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी घुणकी ता. हातकणंगले, येथील भक्ती नरेंद्र जाधव हिने समृद्धी टॅलेंट सर्च परीक्षेत १५० पैकी १४२ गुण मिळवून यश संपादन केले आहे.
तिच्या ह्या यशाबरोबरच तिने जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकवला आहे.यामध्ये भक्ती जाधव हिला शाळेच्या मुख्याध्यापिका माने मॅडम, नाळे सर, मोहिते सर, शेडगे सर, आबदार सर, चरापले मॅडम, रुईकले मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.