१४ ऑगस्ट रोजी चिले महाराज जयंती उत्सव
पैजारवाडी प्रतिनिधी: पैजारवाडी (ता.पन्हाळा येथील प.पु.सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिर संस्थान श्री.क्षेत्र पैजारवाडी येथे सदगुरू चिले महाराज जयंती उत्सव सोमवार दि.१४ ऑगस्ट २०१७ रोजी संपन्न होत आहे.
सालाबादप्रमाणे प.पु.सद्गुरू चिले महाराजांची जयंती सोमवारी दि.१४ रोजी चिलेनामा च्या गजरात मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
पहाटे काकड आरती व सकाळी ७ ते ९ या वेळेत श्रीनां अभिषेक करण्यात येईल. त्यानंतर १२वा श्रीचीं आरती होईल. ठीक दुपारी २ वाजता सद्गुरू चिले महाराजांचा जन्मकाल होईल व महाराजांचा पाळणा गाऊन जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित चिले भक्तांना सुंठवडा वाटप करून खीचडीचा प्रसाद देण्यात येईल. जन्मोत्सवा नंतर भक्तांना भजन व कीर्तन सेवेचा आस्वाद घेता येणार आहे.
तरी सर्व भाविकभक्तजणांनी होणाऱ्या कार्यक्रमाचा व श्रीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन संस्थांनचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण व सर्व विस्वस्त मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.