बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
शिराळा /प्रतिनिधी : चांदोली धरणाच्या पायथ्याशी बिबट्याच्या हल्यात २ वर्षाचे गाईचे वासरू ठार झाले.ही घटना गुरुवारी सकाळी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. वाट चुकुन हे वासरू नदीमार्गे धरण परिसरात गेले असावे असा अंदाज आहे. घटना घडली त्यावेळी पायथ्या लगत सुरक्षा कर्मचारी पहारा देत असताना बिबट्याने वासरू मारल्याची घटना पाहिली. हिस्त्र प्राण्यामुळे सुरक्षारक्षका मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . दोनच दिवसापूर्वी मगर धरणाच्या भिंतीवर आढळुन आली होती तर आज बिबट्याने वासराचा बळी घेतला. आहे.
धरणावरील पथ दिवे बंद आहेत.धरणाची सुरक्षा करणे कठीण झाल्याचे कर्मचाऱ्यांतुन बोललेे जात आहे.