उद्या दि.२६ मे रोजी शिराळा नगरपंचायत च्या मतदानाची, मतमोजणी
शिराळा ( प्रतिनिधी ): उद्या शुक्रवार दि.२६ मे रोजी शिराळा नगर पंचायत साठी झालेल्या मतदानाची, मतमोजणी सकाळी १० वाजलेपासून शिराळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं होणार आहे. या मतमोजणीचा निकाल ११ वाजेपर्यंत लागण्याची अपेक्षा आहे.
शिराळा नगर पंचायत च्या १७ जागेसाठी मतदान करण्यात आले होते. मतमोजणीसाठी ७० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ९ टेबल वर दोन फेरीत मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीत १,३,५,७,९,११,१३,१५,१७ या प्रभागांची मत मोजणी होईल तर दुसऱ्या फेरीत २,४,६,८,१०,१२,१४,१६ या प्रभागांची मतमोजणी होणार आहे.
मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत निकाल अपेक्षित राहील.